सेलू तालुक्यातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील दोंघा आरोंपीना बुधवारी 7 सप्टेंबर रोजी जिंतूर शिवारात ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
सेलू पोलीस ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या आईने सोमवारी सायंकाळी एक तक्रार दाखल केली होती; त्याद्वारे आपली दहा वर्षीय दहा महिन्याची मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर पळून नेले; जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलास मारहाण करून ढकलून दिले तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या दोंघा अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला असे नमूद केले होते.
दरम्यान संशयीत आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेले फोटो पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. फोटोतील व्यक्तींची माहिती असल्यास जिल्हा पोलिसांना कळवावे असे आवाहन केले होते.