यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सावरगड शेत शिवारात एक अनोळखी मृतदेह आढळून आला.  ही घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगड शेत शिवारात एक अनोळखी मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. ही माहिती त्यांनी तात्काळ यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना दिली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत सावरगड येथे घटनास्थळी घेतली. वृत्त लिये पर्यंत अनोळखी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात येत आहे.