अध्यात्मिक प्रवचनकार प्रमोद दिनानाथ केणे याने महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बलात्कार व शारिरीक अत्याचार केले बाबत गुन्हा रेवदंडा पोलिस स्टेशन , ता. अलिबाग येथे नोंदविण्यात आला आहे. 

या आरोपीवर जादुटोणा विरोधी कायदा अंतगर्त गुन्हा दाखल करणे बाबत निवेदन रेवदंडा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती च्या वतीने देण्यात आले आहे.

 रेवदंडा पोलीस ठाणे अंतर्गत अध्यात्मीक प्रवचनकार प्रमोद दिनानाथ केणे याने पिडीत महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बलात्कार व शारिरीक अत्याचार केले बाबत गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची बातमी वाचनात आली. सदर अध्यात्मीक प्रवचनकार हा शिवदत्त मंदिरात धार्मिक कार्यक्रम करुन भोळया नागरीकांना अंधश्रध्देच्या नादी लावत असल्याचे दिसून येत आहे. सदर इसमाने पिडीत महिलेला अध्यात्मीक व धार्मिक अंधश्रध्देच्या माध्यमातून शारिरीक, मानसिक व लैगिक शोषण करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 यातील कलम 2 (1) (ख ) मध्ये दिलेल्या अनुसुचीतील अ.क्र. 11 (क) मध्ये वर्णन केल्या नुसार हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच या कायदयाच्या अंतर्गत अशा भोंदुगिरी करणाऱ्या व या माध्यमातून नागरिकांचे आर्थीक, मानसीक, शारिरीक शोषण व स्त्रीयांचे लैगिक शोषण करणाऱ्या भोंदुवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. 

पिडीत महिलेचे शोषण करणाऱ्या भोंदू प्रवचनकार “प्रमोद दिनानाथ केणे” याच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 या कायदया अंतर्गत सुध्दा गुन्हा दाखल करावा. तसेच सदर अध्यात्मीक प्रवचनकार ज्या ठिकाणी लोकांचे धार्मिक कर्मकांड व अंधश्रध्देव्दारे शोषण करीत होता. त्या ठिकाणी या प्रकारे आणखी काही प्रकार घडला असल्यास त्या बाबत चौकशी करावी. अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती रायगड जिल्हा शाखेच्या वतीने नितीनकुमार राऊत, जिल्हा प्रधान सचिव संदीप गायकवाड, तसेच जिल्हा पदाधिकारी सुप्रिया जेधे, प्रभाकर नाईक व महेंद्र नाईक यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

 तसेच या भोंदू प्रवचनकार “प्रमोद दिनानाथ केणे” याने आर्थीक व शारिरीक तसेच लैगिक शोषण केले असल्यास तसेच जर कोणाची फसवणूक झाली असेल त्याने तात्काळ रेवदंडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी. तसेच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे संपर्क साधावा. या भोंदू प्रवचनकारावर कठोर कारवाई व्हावी या करीता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पिडीतांना मदत व पोलीसांना सहकार्य करणार आहे. असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे करण्यात येत आहे.

तरी आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे