शिक्षण खात्याच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ ही स्पर्धा पार पडते यंदाच्या ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन -२०२२’ या ग्रॅण्ड फायनल स्पर्धेमध्ये वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विविध चार संघांनी प्रत्येकी एक लाख रुपये, अशी एकूण चार लाख रुपयांची पारितोषिके पटकावून पुन्हा एकदा आपल्या अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अशा दोन स्वरूपातून ही स्पर्धा होते. मार्च २०२२ मध्ये झालेल्या उपांत्य फेरीत विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६३ संघांपैकी डब्ल्यू.आय.टी.च्या सात संघांची निवड ग्रॅण्ड फायनलसाठी झाली.
१) ‘द हेक्सास्प्रा’ संघ कर्नाटक, बंगळुरू मध्ये जाऊन ‘ई – वेस्ट मॅनेजमेंट’ या थीमवर सुधारित अशा एस.ए.डब्ल्यू.ए.एस. या प्रणालीचे सादरीकरण केले. या मध्ये माहिती तंत्रज्ञान उपकरणा सोबतच मशीन लर्निग तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे. या मुळे ई- कचरा हाताळण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल. टीम लीडर संयम रवणे यासह राजस दर्यापूरकर, सुनयना वेळापुरे, जीत शेंडेकर, अमन जैन (सर्व सी.एस. ई.), प्रतीक्षा तमशेट्टी (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग) या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
२) आपत्ती व्यवस्थापन थीम घेऊन (गांधी नगर, गुजरात) येथे टेक आर्मी संघाने प्रकल्प सादर केला. "धरणांमधून पुराचे पाणी पुढे सोडल्यानंतर नदीकाठच्या शहरात पूरस्थिती निर्माण होते. तेव्हा पाण्याच्या विसर्गाचे गणित करून भौगोलिक परिस्थितीनुसार पाणी किती दूरपर्यंत
पोहोचेल याचे गणित करणे आणि त्यानुसार संभाव्य पुराची मोबाइल अँप्लिकेशन द्वारे पूर्वसूचना देणे" असे या प्रयोगाचे स्वरूप आहे. टीम लीडर – स्वाती कुलकर्णी सह मधुरा सरसंबी, श्रावणी नोरा (तिघीही सिव्हिल ) अक्षिता जोशी – सीएसई, दुर्गेश कुडलकर , वरुण लोहड़े (दोघेही –सी.एस.ई) . या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
३) दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरबाबत मार्गदर्शन करणारे हे यशस्वी प्रयोग आहे. All for one and one for all doesn't fit for everybody. हे लक्षात घेता "वन अँड झीरो ब्रेन्स" संघाने ने एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड वेब बेस्ड प्लॅटफॉर्म तयार केलं.मल्टिपल इंटेलिजन्स थियरी चा वापर करून एक चाचणी तयार केली. ज्या योगे विद्यार्थ्यांना त्यांची बुद्धिमत्ता, करिअर मार्ग ओळखता येतो आणि त्या करिअर संबंधी माहिती सुद्धा मिळवता येते. तेलंगनाच्या वारंगळला गेलेल्यामध्ये टीम लीडर - प्रणाली बावधानकर या विद्यार्थिनीसह लावण्या आकेन, तुलसी कोकरे, प्रणोती कोडम, हेमंत देशमुख आणि निधिश पाटील (सर्वजण आय.टी.) या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
४) पेन रिलीव्हर संघाने ‘नी बडी’ हे उपकरण बनविले. ज्येष्ठ नागरिकांना गुडघ्यातील वंगण कमी पडल्याने गुडघा दुखीच्या वेदना असह्य होतात. अशा लोकांना या यशस्वी प्रयोगामुळे दिलासा मिळणार आहे. ‘नी बडी’ उपकरणाच्या उपयोगाने ज्येष्ठांना वेदना रहित सहज चालणे शक्य होणार आहे. तामिळनाडूच्या चेन्नईला जाऊन यश संपादन प्राप्त केलेल्या मध्ये टीम लीडर विद्यार्थी अक्षय कुलकर्णी सह केदार आदटराव, राहुल जैन, तन्वी शिंदे, वैष्णवी चव्हाण आणि म. तसद्दुक (सर्वजण मेकॅनिकल) या विद्यार्थ्यांचे योगदान होते.
प्राचार्य डॉ. विजय आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सी.एस.ई. विभाग प्रमुख डॉ. अनिता पुजार, आय. टी. विभाग प्रमुख डॉ. एलएमआर जे लोबो प्रा. कोमल परदेशी आदींनी संयोजनासाठी मेहनत घेतली. या यशाबद्दल वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त श्री भूषण शहा, श्री पराग शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.