मुख्य संपादक: माबुद खान
दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला जातो. २०२२ - २३ यावर्षी देखील जिल्ह्यातील ११ जिल्हा परिषद शिक्षकांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली आहे.
मुख्य कार्यकारी आधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि पारदर्शक झालेल्या निवड प्रक्रियेत जिल्हा परिषद शाळेतील ९ प्राथमिक शिक्षक आणि २ माध्यमिक शिक्षक अशा एकूण ११ शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या असून सदर शिक्षकांना जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या निवडीत चारठाणा उर्दू शाळेवर मागील सहा वर्षा पासुन सेवा बजावनार्या आणी विशेष म्हणजे कोविड काळात घरो घरी जाऊन शिक्षण देत आपली सेवा आविरत देणार्या *शेख इकबाल इस्माईल* या शिक्षकाला हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा सत्कार नानासाहेब राऊत यांच्या वतीने करण्यात आला. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले जातात यामधून प्राप्त प्रस्तावांपैकी प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड केली जाते. सन २०२२-२३ या वर्षीच्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षक १.जिंतूर - ७, २.सेलू - ३, ३.मानवत - २. ४. पाथरी - १. ५.सोनपेठ - ३. ६.गंगाखेड - ३. ७.पालम - १. ८.पूर्णा - ४. ९.परभणी - ६ तर माध्यमिक शिक्षका मधून परभणी व सोनपेठ तालुक्यातून प्रत्येकी एक या प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाले होते. पठाण शौकतखां उपशिक्षणाधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीचे गठण करुन प्राप्त सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी मा. शिक्षणाधिकारी प्रा.या चार सदस्यीय समिती मार्फत प्रत्येकी १० गुणांच्या मर्यादेत गुणांकन करुन एकुण ४० गुणांपैकी सर्वाधिक गुणप्राप्त उत्कृष्ट शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विशेष निगराणीत केवळ गुणवत्तेच्या आधारे वस्तूनिष्ठ व पारदर्शक पद्धतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट शिक्षक निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या नविन मानांकनामुळे ही उत्कृष्ट शिक्षकांची निवड पारदर्शक झाली आसुन या चाचणीत जिल्ह्यातुन पात्र ठरलेल्या चारठाणा येथील जि.प. प्राथमिक उर्दु शाळेतील शिक्षक शेख इकबाल सर या शिक्षकाचे स्वागत आणि सत्कार नानासाहेब राऊत यांच्या वतीने त्याच्या निवासस्थानी करण्यात आले या वेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा सदस्या मिनाताई राऊत, ओ.बी.सी नेते नानासाहेब राऊत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष स.खैसर भाई, उपाध्यक्ष राजु काझी, व्हाईस चेअरमन एकबालोद्दीन काझी, उपसरपंच वाजेद कुरेशी, मा. उपसरपंच तहेसीन देशमुख, स. करीम, ग्रा.पं.सदस्य नानासाहेब निकाळजे,शिवशंकर तमशेट्टे, सलाम ईनामदार, मा.सदस्य बाबासाहेब म्हेत्रे, स.आनवर सर,रामकृष्ण मस्के, बंडु रासवे, आसेफ पठाण, सुरेश तमशेट्टे, मंथय्या स्वामी ,दत्ता क्षीरसागर, यांच्या सह प्रभाकर कुर्हे उपस्थित होते