21 ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता येत्या २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते ५ या दोन सत्रात वाशिम शहरातील ६ परीक्षा उपकेंद्रावर २०६४ परीक्षार्थीं परीक्षा देणार आहे.परीक्षेच्या दिवशी परीक्षा उपकेंद्रावर १०० मीटरच्या परीक्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार होऊ नये यासाठी फौजदारी दंड संहितेचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

  परीक्षा उपकेंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी/ पर्यवेक्षक/समवेक्षक/ सहाय्यक कर्मचारी /परीक्षार्थी/ परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांचेकडून नियुक्त केलेले अधिकारी सोडून इतर इसमांना प्रवेशास मनाई राहील. परीक्षा उपकेंद्रावर १०० मीटरच्या आत रस्त्यावरुन वाहन नेण्यास मनाई राहील. १०० मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी/ आयएसडी/ झेरॉक्स/ फॅक्स/ ई-मेल/ ध्वनिक्षेपक इत्यादी सुविधांवर प्रतिबंध राहील. परीक्षा उपकेंद्रावर मोबाईल फोन, वायरलेस सेट, रेडिओ, दूरदर्शन,

कॅलक्युलेटर, कंप्यूटर वापरण्यास बंदी राहील. उपकेंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी चारपेक्षा जास्त व्यक्ती प्रवेश करणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील. असे जिल्हादंडाधिकारी, वाशिम यांच्या आदेशात नमूद केले आहे.