रायगड जिल्हा हा संघर्ष करणाऱ्यांचा जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. या मातीत अनेक महापुरुष, कामगार नेते, सामाजिक कार्यकर्ते, नेते जन्मले व इथला विकास घडवून आणला.बॅ अंतूले यांनी रायगड जिल्ह्याचा विकास केला. काँग्रेस पक्ष तळागाळात नेला मात्र स्व.बॅरिस्टर अंतुले यांच्या नंतर रायगड मध्ये कॉंग्रेस पक्षाची बिकट अवस्था झाली. त्यातच कै. माणिकराव जगताप , कै.मधुकरशेठ ठाकूर,कै.श्याम म्हात्रे यांच्या अचानक जाण्यामुळे पक्षाची अवस्था अधिकच गंभीर झाली. अश्या विपरित परिस्थितीत रायगड जिल्हात भाजपची लाट संपूर्ण देशात, राज्यात व रायगड जिल्ह्यात असतांना रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा महेंद्रशेठ घरत यांच्याकडे आली.घरत यांनी सर्व प्रथम जिल्ह्यातील जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण जिल्हा पिंजून काढला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेवटच्या भागा पर्यंत जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विश्वास देण्याचा काम महेंद्रशेठ घरत यांनी केल आहे.जिल्ह्यातील मागील काही महिन्या पूर्वी स्थानिक स्वराज्य स्वस्थांनच्या निवडणुकीत साम, दाम.देऊन काँग्रेस पक्षाचे जिथे सदस्य निवडून आले नव्हते तिथे काँग्रेस पक्षाने विजय मिळवताना जनतेने पाहिले आहे.जिल्ह्यात काही तालुक्यात १०-१२ वर्षे काँग्रेस कार्यकारणीच्या बैठका होत नव्हत्या त्या ठिकाणी स्वतः महेंद्र घरत यांनी जाऊन तेथील काँग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जेष्ठ मंडळींना सोबत घेऊन तेथील बैठका चालु केल्या.जनतेने व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड विश्वास महेंद्रशेठ घरत यांच्यावर ठेवला आहे. त्या विश्वासाला घरत हे कुठेही कमी पडताना दिसत नाही. आणि यामुळेच रायगड जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आलेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण करून आशा पल्लवीत केल्या. रायगड जिल्हा कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना आज कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. हे करताना महेंद्र घरत यांनी तन मन धन पूर्णपणे समर्पित केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून जिल्हा काँग्रेसला जे जे कार्यक्रम पक्ष वाढी साठी पाठवले जातात ते सर्व कार्यक्रम रायगड जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि जिल्हा काँग्रेस कमिटी यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहे . काँग्रेस पक्षाची डिजिटल मेंबरशिप मध्ये महाराष्ट्र राज्यात रायगड जिल्हाचे काम हे अत्यंत उल्लेखनिय राहिले आहे. त्याच बरोबर कोकण डिजिटल मेंबर्ससिप आढावा बैठक व महाराष्ट्र राज्य OBC चा मेळावा हा डोळ्यांचे पारणें फेडणारा असाच होता.देशातील काना कोपऱ्यातून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी या मेळाव्याचे आयोजन आणि नियोजन पाहुन जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची तोंडभरून स्तुती केली व पाठीवर कौतुकाची थाप हि मारली.आणि तेव्हा पासुन खऱ्या अर्थाने महेंद्रशेठ घरत यांनी प्रदेश काँग्रेस कमिटी वर आपल्या कामाच्या बळावर एक वेगळीच छाप सोडली आहे.त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटीवर त्यांचे वर्चस्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.प्रदेश काँग्रेस कडुन आलेले सर्व कार्यक्रम रायगड जिल्ह्यात राबविण्यात व ते यशस्वी करण्यासाठी ते ज्या ज्या वेळी जिल्ह्यात दौऱ्यावर जातात त्या त्या वेळीस जिल्हातील प्रत्येक सेल चे अध्यक्ष,प्रदेश प्रतिनिधी, स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते यांना सोबत घेऊन ते त्या ठिकाणी काम करतांना सर्वांना पाहायला मिळत आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाणार असं त्यांचे कुशल नेतृत्व आहे.आणि त्यांच्या या नेतृत्व गुणांमुळेच रायगड जिल्ह्यात युवक काँग्रेस फादर बॉडी, महिला काँग्रेस आकर्षित झालेली पाहायला मिळत आहे.आणि यामुळेच रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढतांना आपणास पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यात महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात आज मोठया प्रमाणात इतर पक्षातील लोक प्रवेश करतांना आपल्याला पाहायला मिळतात त्याचे सर्व श्रेय हे जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनाच जाते.विविध प्रकारचे धरणे, मोर्चे, रॅली, मळावे, पक्षप्रवेश आणि बैठका घेऊन पक्षाचा आवाज रायगड जिल्ह्यात घरत यांनी बुलंद केला. त्यांच्या सततच्या व्यस्त कार्यक्रमामुळे कॉंग्रेस पक्षाला सुगीचे दिवस आल्याची चर्चा जनमानसात दिसून येते. अश्या या मुलुख मैदानी बुलंद तोफ असलेल्या नेतृत्वाला पुढील प्रगतीशील वाटचालीस पुन्हा हार्दिक शुभेच्छा द्याव्याच वाटतात.महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष पदाची धुरा यशस्वी आणि प्रभावीपणे सांभाळल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.