माजलगाव (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील परळी शहर येथे बालाजी गुट्टे नावाच्या एका इसमाने फेसबुक या सोशल मीडिया प्लैटफॉर्म वरती अल्लाह(ईश्वर) विषयी अपशब्द वापरले, ईशनिंदा केली. त्या विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे. त्या इसमाला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. परंतु भविष्यात कोणीही असे कृत्य करू नये जेणेकरून कोणत्याही समाजाचे धार्मिक भावना दुखावतील किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल, दोन समाजात द्वेष निर्माण होईल व असे कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या किंवा मानसिकता असलेल्या लोकांना सुद्धा अद्दल घडावी म्हणून त्या इसमावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई करावी, दाखल झालेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) आयटी अॅक्टच्या अजून कलमे लावून त्याची सहजरित्या सुटका होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलावे, भारतात ईशनिंदा प्रतिबंधक कायदा करावा या मागण्यांसाठी मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने तहसील कार्यालय माजलगाव, माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम नीलम बाफना यांना व शहर पोलीस स्टेशन, माजलगाव येथे निवेदने देण्यात आली. यावेळी मौलाना आझाद युवा मंच चे जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस, एडवोकेट शेख खालील अहमद साहब, एडवोकेट इनामदार वसिउद्दीन, शेख माहदी हसन व इतर नागरिक उपस्थित होते.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं