औरंगाबाद : दि.५ (दीपक परेराव) औरंगाबाद सिडको येथे नुकताच पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तरुणांना कर्ज दिले जात नाही हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज रामा हॉटेल औरंगाबाद येथे बँक ऑफ महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर समिती बैठकच्या वेळीस केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड साहेब यांची भेट घेतली.
मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज पुरवठा करताना राष्ट्रीय बँका टाळाटाळ करता किंबहुना उभे सुद्धा करत नाही. त्यामुळे सर्व बँक अधिकाऱ्यांची आपल्या अध्यक्षतेखाली आमच्या समवेत बैठक घेऊन बँकांना निर्देश द्यावेत अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांना केली.
बैठकीत ठरल्याप्रमाणे एक मुद्दा आज पुढे आणला तसेच ठरल्याप्रमाणे महिला भगिनींनी याचे निवेदन दिले. यावेळी मराठा क्रांती मोर्च्यांचे सर्व समन्वयक उपस्थित होतो.