श्री विसर्जन कालावधीत घाणेवाडी तलाव परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

      जालना :- गणेशोत्सव दि. 9 सप्टेंबर 2022 पर्यंत साजरा करण्यात येणार असून दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी श्री विसर्जनाकरीता यावर्षी मोतीबाग तलाव येथे व्यवस्था करण्यात आली आहे. काही गणेश मंडळ या ठिकाणी गर्दी असल्यास घाणेवाडी तलाव येथे विसर्जनाकरीता जाण्याची शक्यता आहे. घाणेवाडी तलावातुन पिण्याचे पाणी जालना शहरात येत असल्याने तेथे श्री विसर्जनाकरीता गेल्यास गावकरी त्यास विरोध करुन तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दि. 9 सप्टेंबर रोजीच्या श्री विसर्जन कालावधीत अपर जिल्हादंडाधिकारी यांच्याद्वारे फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहेत. हा आदेश दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी दिवसभर व दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या दुपारी 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. 

-*-*-*-*-