कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

             वाघोली, ता. हवेली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयात एन. एम. एम. एस. आणि स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन संदर्भातील पालक सभा नुकतीच विद्यालयात संपन्न झाली.

             आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच केंद्र शासनामार्फत राबवली जाणारी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) अतिशय महत्त्वाच्या असतात. त्या अन्वये सभेमध्ये परीक्षेचे स्वरूप व महत्त्व या संदर्भातील मार्गदर्शन पालकांना करण्यात आले. मागील वर्षीच्या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारी शिष्यवृत्ती या संदर्भातील मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील शिक्षक राहूल कदम यांनी मागील वर्षांच्या निकालाचे विश्लेषण केले तर रेश्मा शितोळे यांनी परीक्षेचे स्वरूप स्पष्ट केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांनी पालकांना स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि महत्त्व तर प्राचार्य संतोष भंडारी यांनी शालेय शिस्त आणि नियम संदर्भात मार्गदर्शन केले.

            सदर पालक सभेस विद्यालयातील शिक्षक दगडू धावरे, राहुल कदम, अशोक पाटील, रेश्मा शितोळे आदी उपस्थित होते. सदर सभेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पवार तर प्राचार्य श्री.संतोष भंडारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.