आंतरधर्मीय विवाहाची परवानगी नसतानाही येथील विजयी कॉलनी स्थित चंद्रविला धर्मदाय संस्थेकडून विशिष्ट समुदायातील दोघांचा विवाह लावून बनावट प्रमाणपत्र देण्यात आले होते. राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप केला होता. अखेर या प्रकरणात चंद्रविला संस्थेविरुद्ध अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दहशतवादी अजमल कसाबचे वकीलपत्र स्वीकारणारे महेश देशमुख याच संस्थेचे आहेत.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 त्यामुळे देशद्रोही व्यक्तींच्या मुसक्या बांधल्या पाहिजे, त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे; अशी मागणी खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे. 

जिल्ह्यातील धारणी येथील उच्चशिक्षित तरुणीला रुग्णवाहिका चालक असणाऱ्या एका विशिष्ट धर्माच्या युवकाने प्रेम जाळ्यात अडकवून अमरावती येथे आणले होते. विजय कॉलनी स्थित महेश देशमुख यांच्या चंद्रविला चारिटेबल ट्रस्ट कडून दोघांचे लग्न लावले होते. संबंधित संस्थेला आंतरधर्मीय विवाह लावण्याची अनुमती नसताना महेश देशमुख यांच्या संस्थेकडून बनावट मॅरेज सर्टिफिकेट देण्यात आले होते, ही धक्कादायक बाब राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उघडकीस आणत सदर प्रकरण हे लव्ह जिहादचे असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्याशी डॉ. बोंडे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संबंधित प्रकार अतिशय गंभीर असल्याने कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी विजय कॉलनी स्थित चंद्रविला संस्थेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.