त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील नवगाव येथील त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालयात दि.५ सप्टेंबर सोमवार रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेमध्ये संपुर्ण स्वयंशासन दिन पाळण्यात आला. शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक, शिपाई आदी पदे शाळेतील विद्यार्थ्यांनी भुषवली. विद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला. मुख्याध्यापक म्हणून कोमल चौधरी यांनी काम पाहिले, तर
कोमल चौधरी,सानिका तरटे,साक्षी देवटे,गितांजली मुळे,स्नेहल भाकरे,श्रुती जाधव,कल्याणी,ओम चौधरी,वैभव सोनवने,शुभम गायके, सुनिल मेरड, अभिषेक भावले,अबजत पठाण, इरफान शेख,अलफिया पठाण,सार्थक साबळे, कार्तिक गलधर, धनश्री साबळे,प्रणाली चौधरी, सुप्रिया पवार,सिफा शेख,आरती गवळी,शोहेब पठाण, फरहान शेख,शफिक शेख या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भुमीका पार पाडली. तसेच छोटाखानी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक बेटवार सर,शिक्षिका संगिता खिंडरी,शिक्षक समशेर पठाण,उदय परळकर,अशोक केदार,मनोज रावस,ज्ञानेश्वर डुकरे, इम्तीयाज शेख,नजीर शेख आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.