दंतुलवार साहेब याना गस्त वाढवान्याची. गरज

जिंतूर शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 24 तास वर्दळीच्या ठिकाणी पोलीस चौकी समोरची एक नव्हे 4 दुकाने फोडून प्रशासनाला मोठे आव्हान दिले आहे

गणेशोत्सव काळात तगडा बंदोबस्त असताना तेही मुख्य चौकात या चोरट्यांनी हे धाडस केल्याने व्यापारी वर्गात मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे आजवर गेल्या अनेक वर्षात गणेशोत्सव काळात कधीच चोरी झाली नसल्याने या बाबी कडे पोलीस दलाने गंभीरतेने घ्यायला हवे

पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे कार्यालय असूनही त्यांचा आवश्यक तो धाक पोलीस यंत्रणेवर दिसून येत नाही कर्व्यय कठोर श्रवण दत्त सारखे अधिकारी असते तर या चोरट्यांनी धाडस केले नसते अशी चर्चा व्यापारी वर्गात आहे

भोलेनाथ इलेक्ट्रॉनिक पुरोहित स्वीट्स यमुना मनशरी सोनी मेडिकल या दुकानाचे शटर उचलून चोरी करण्याचा प्रयत्न झाला किरकोळ रक्कम जाता मोठा ऐवज व मिठाई ची पण चोरी या चोरट्यांनी केली नाही हे विशेष पण मुख्य चौकातील दुकाने फोडून पोलीस दलाला मात्र मोठे आव्हान दिले आहे हे मात्र निश्श्चित दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी रमेश दरगड प्रदिप कोकडवार राजू देवकर गणेश कुरे सुनील तोष्णीवाल या व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दीपक दांतूलवार यांची भेट घेऊन केली आहे