प्रतिनिधी
नुकतीच सेवानिवृत्ती झाल्याबद्दल पेठशिवणी येथील भूमिपुत्र भारतीय सैनिकाचा त्यांच्या घरी जाऊन आम आदमी पार्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सन्मान केला.
पेठशिवणी येथील भूमिपुत्र माधवराव गजले हे वीस वर्षांपूर्वी पुणे विभागातून सैन्य दलात दाखल झाले. वीस वर्षे संपूर्ण देशभर व दक्षिण आफ्रिकेतही शांती सेनेच्या तुकडीमध्ये सेवा करून ते शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. याबद्दल ग्रामस्थांनीही त्यांचा मिरवणूक काढून सत्कार केला. भारतीय सैनिकांच्या सेवेचा सन्मान म्हणून आज रविवारी आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख जयवंतराव कुंडगीर यांनी गजले यांच्या गावी पेठशिवणी येथे जाऊन त्यांच्या घरी सन्मान केला. या सन्मानाने सैनिक गजले हे चांगले भारावून गेले.