मुंबई कमेटीच्या वतीने विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
रोहा : 03 सप्टेंबर 2022(गोफण प्रतिनिधी)
मुरुड तालुक्यातील विहुर या गावी मुंबई कमेटीच्या वतीने शैक्षणिक दृष्ट्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.हा कार्यक्रम मुंबई कमेटीच्या वतीने विहूर या गावी करण्यात आले.मुंबई कमेटीचे अध्यक्ष श्री अशोक भिकू बामुगडे व उपाध्यक्ष श्री गजानन रघुनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे चेतन अशोक सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.यावेळी अनेक वक्त्यांनी आपले मार्गदर्शक पर भाषण केले.प्रामुख्याने गावचे अध्यक्ष महेंद्र महादेव कदम,व उपाध्यक्ष दामोदर राम बांद्रे,तसेच वंदना अरविंद दळवी, सुजीत दामोदर महाडिक, संतोष बळीराम पोटले, हरेश अरुण नाईक, अशोक भिकू बामुगडे,उत्कर्ष उदय महाडिक,यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.