दिवाळी सण तोंडावर असतांना सगळ्यांची दिवाळी गोड होत असते.समाजातील काही घटक रोज कमावणे व २ वेळचा चरितार्थ व आपला उदरनिर्वाह करतात. कंत्राटी कर्मचारी नगरपरिषद कन्नड यांनी या बाबत कन्नड मनोज पवार यांच्या कडे समस्या सांगितली . नगरपरिषद कन्नड यांचे --सफाई कंत्राटदार यांची टेंडर मुदत संपली असून त्यांना एक्सटेंशन मुदत वाढ देण्यात आली आहे.कंत्राटदार ५ते६ महिन्यापासून या कंत्राटी कामगार यांना वेतनास टाळाटाळ करत होता. थातुरमातुर उत्तर देत होता.केंद्रीय रेल्वे -मंत्री रावसाहेब दानवे पाटिल यांच्याकडे जाऊन उद्योजक मनोज पवार यांनी कंत्राटी सफाई कामगार वेतन यांचा विषय मांडला.मंत्री-मोहदय यांनी तात्काळ *-जिल्हा प्रशासन* यांना दूरध्वनी करून *सफाई कंत्राटदार* कन्नड यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून *१४,व्या वित्त आयोगातून न.प? मुख्याधिकारी* यांना पगार करण्याचे आदेश दिले आहे. २ महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न मनोज पवार यांच्या पाठपुराव्याने मिळाल्याने कंत्राटी सफाई कामगार यांनी समाज-सेवक उद्योजक मनोज पवार,यांचे आभार मानले आहे.तसेच सफाई कंत्राटदार कर्मचारी यांचे पगार करत नसेल तर असल्या लोकांनी टेंडर घेऊ नये.पुढील काळात नगरपरिषद कन्नडने लवकरात लवकर टेंडर काढून शहर स्वच्छता कसे राहील व त्यासाठी लागणारी यंत्रणा सक्षम करावी असे मत- व्यक्त केले आहे