इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या उपक्रमांतर्गत शिक्षक आणि विद्यार्थी यांनी नोंदणी करण्याचे गोंडवाना विद्यापीठाचे आवाहन
गडचिरोलीदि. 30 इन्फोसिस लि. बंगलोर या कंपनीबरोबर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सामंजस्य करार केलेला असून सदर सामजंस्य करारांतर्गत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यापासून प्रौढांपर्यंत सर्वांना
इन्फोसिस लि. या कंपनीच्या इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या उपक्रमांतर्गत ३९०० हून अधिक अभ्यासक्रमाचे वर्ग आभासी प्रणालीद्वारे घेण्याचे ठरले आहे.
तरी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच विद्यापीठातील पदव्युत्तर शैक्षणिक विभागांचे सर्व विभागप्रमुख यांनी त्यांच्या स्तरावर अधिनस्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड नोंदणीस प्रोत्साहित करावे.
तसेच लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाने केले आहे.