उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद मध्ये एका तरूणाने फेसबुकवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासली असुन पत्नी आंघोळ करत असताना त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार या माथेफिरू पतीने केला असुन पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार फिरोजबाद येथील एका 26 वर्षीय महिलेच्या पतीला सोशल मीडियाचं व्यसन लागल्यामुळे तो एवढं मोठं गैरकृत्य करण्यावर उतरला. पोलिस तक्रारीत या महिलेने तिचा 28 वर्षीय पती संदीप आरोपी असल्याचं म्हटलं आहे. महिलेने आरोप केला की, तिचा पती दिल्लीच्या उत्तम नगर भागात राहतो. तो सर्कसमध्ये काम करतो.
महिलेच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी ती जेव्हा तिच्या आईच्या घरी गेली होती तेव्हा पतीचा व्हिडीओ कॉल आला होता. यादरम्यान महिला बाथरूममध्ये फोन ठेवून त्याच्यासोबत बोलत होती. दरम्यान पतीने तिचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला आणि फेसबुकवर स्वतःचे फॉलोअर्स वाढविण्यासाठी पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला. पत्नीच्या हि गोष्ट लक्षात आल्यावर तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिलेने पतीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि त्याला तुरूंगात डांबण्याचा आग्रह केला आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत असून लवकरच त्याला पकडण्यात येईल असा दावा केला जात आहे.
आरोपी संदीपने पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच तो काही सेकंदातच व्हायरल झाला. संदीपच्या पत्नीला तिच्या नातेवाईकांचे फोन येऊ लागले होते. यानंतर जेव्हा संदीपच्या पत्नीने व्हिडीओ पाहिला तेव्हा तिला धक्का बसला. तिने लगेच पतीला फोन केला आणि व्हिडीओ डिलीट करण्यास सांगितलं. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याचं फेसबुक अकाउंट डिलीट केलं आहे.