वाशिम मद्ये बनावट दारुचा गोरखधंदा ४.४३ लाखाची बनावट दारू जप्त.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 

वाशिम : (नितीन थोरात)शहरात बनावट विदेशी दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या वाईनबारवर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी कारवाई केली.त्यात ४.४३ लाख रु.ची बनावटी विदेशी दारू जप्त करून आरोपीला अटक करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ४.४३ लाख रु.ची बनावटी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अतुल मोहनकर यांना २ सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा येथील प्रभाकर वानखडे हे त्यांचे मालकीचे आयुष वाईनबारमध्ये हलक्या दर्जाच्या विदेशी दारूमध्ये स्पिरीट सारखे द्रावण मिसळून वेगवेगळया कंपनीची विदेशी बनावट दारू तयार करून ति त्यांच्या बारमध्ये वाहतूक पासवर आलेल्या विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यात भरून बनावट विदेशी दारूची विकी करित आहे.

 

या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व राज्य उत्पादन शुल्क वाशिमच्या पथकानेन संयुक्तरित्या आयुष वाईन बारवर धाड टाकली असता, तेथे वेगवेगळया कंपनीची वेगवेगळया ब्रांडची ६३,९३५ रुपये किमतीची विदेशी दारू व ३३६० रुपये किमतीची, ३५०० रुपये किमतीची हलक्या दर्जाची प्लास्टिक बॉटलमधील विदेशी दारू, उग्रवासाचे १०० रुपये किमतीचे स्पिरिट आणि बनावट विदेशी दारू बनविण्याकरिता उपयोगात येणारे प्लास्टिकचे १६६९ रुपये किमतीचे झाकण असा एकूण असा एकुण ४ लाख ४३ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानरे पोलिसांनी तो पंचासमक्ष जप्त करून आयुष बारचे मालक प्रभाकर महादू वानखडे व त्यांचा मुलगा आयुष प्रभाकर वानखडे दोन्ही रा. संतोषीमाता नगर वाशिम यांला अट करीत पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे कलम ३२८, २७३, १८८, ३४ भादंवि मह कलम ६५ (ई), ८१, ८३,१०३, १०८ मु प्रो. ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला.