परप्रांतीय सतरा वर्षीय युवकाचे अपहरण 

'पाचोड येथील आठवडे बाजारातील घटना:आरोपींकडून तीन लाखाची खंडणीची मागणी'

पाचोड/प्रतिनिधी,एका सतरा वर्षीय परप्रांतीय युवकाचे सिनेस्टाईल कारमध्ये बसून  अपहरण केल्याची खळबळजनक घटना पाचोड ता.पैठण येथील  आठवडे बाजारात रविवारी  ३१ दुपारी घडकीस आली. दरम्यान आरोपीकृडून तीन लाख रुपयांची खंडणी मागितली जात असल्याने या प्रकरणी   पाचोड ता.पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस यंञणा सजग होऊन लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. मुकेश राजाराम निगवाल वय (१७)रा ढोलकट ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,पाचोड ता.पैठण येथील मोसंबी  मार्केटमध्ये मोसंबी तोडणीच्या  कामासाठी  परप्रांतीय कामगारांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात  येतात.त्यामुळे मुकेश निगवाल हा देखील पहिल्यांदाच रोजगारासाठी येथे आला.  रविवारी त्याने सकाळी  केश कर्तनालयात जाऊन कटींग केली.त्यानंतर तो आठवडे बाजारात फिरायला गेला बाजारातून  परत मोसंबीमार्केटकडे येत असतांना त्यावेळी तो एका पांढऱ्या रंगाच्या  स्विफ्ट  कारमध्ये बसतांना   मोसंबी मार्केटातील काही परप्रांतीय कामगारांना दिसला त्यांना वाटले की तो बसस्थानकापर्यत बसून उतरला असेल परंतु  बराच वेळ उलटल्यानंतर देखील त्याचा काही थांगपता लागत नसल्याने त्याच्या सोबतच्या मिञांनी  स्थानिक नागरिकांच्या मदतीन  इतरञ शोध काढण्याचा प्रयत्न  केला असता त्याचा कुठेच काही  धांगपत्ता लागत नसल्याने चिंतेत असणाऱ्या कामगारांनी ही बाब ठेकेदाराला कळविली. दरम्यान परप्रांतीय कामगार  कैलास केदार चौहाण यांच्या मोबाईलवर राञी एका अज्ञात व्यतीचा फोन आला त्याने सांगितले की तुमचा साथीदार मुकेश निगवाल याने आमचे तब्बल पन्नास मोबाईल चोरले आहे.त्यामुळे आमच्याकडून त्याचे अपहरण करण्यात आला.त्याला सोडवायचे  असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागणार आहे.आणि  ते पैसे ता.गेवराई जि.बीड येथे आणून द्यावे लागणार असे  संभाषण करून त्याने फोन कट केला घाबरलेल्या कैलासने लगेच पाचोड,पोलिस ठण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सदर घटनेचे गांभीर्य समजून सहकाऱ्या समवेत तातडीने परिसरात तपासाचे चक्र फिरवल्यानंतर काही धागेदोरे सापडतील या आशेने त्यांनी गेवराई येथील आयआरबीच्या टोलनाक्यावर जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तेव्हा काही  पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार बीडकडे जातांना आढळले या प्रकरणी पाचोड ता.पोलिस ठाण्यात कलम ३६२  भांदवि  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास  सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे हे  करीत आहे.