थेऊरचा चिंतामणी गणपती मयुरेश्वरुढ रूपात

येथील श्री चिंतामणी गणपती आज अवतरला मयुरेशावर,गेली तीन दिवसापासून येथे वेगवेगळ्या स्वरूपात बाप्पाच्या दर्शनाची पर्वणीच गणेश भक्तांना मिळत आहे.हे विलोभनीय दर्शन आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गावातील ग्रामस्थासह परिसरातील भाविकही मोठी गर्दी करत आहेत.

श्री चिंतामणी बाप्पाचे पुजारी आगलावे बंधू यांनी यावर्षीपासून गणेशोत्सवा दरम्यान नवनवीन संकल्पना राबवत असून यातून बाप्पा नविन रुपात दर्शन देत आहेत.

आज पक्षीराज मयुरेशाचे सिंहासन चिंतामणी साठी तयार करण्यात आले आहे.खरेतर भगवान गणपतीचे मोठे बंधू कार्तिकेय स्वामी यांचे वाहन मयुर आहे आणि मयुरावर स्वार होऊन ते ब्रह्मांडात भ्रमण करतात. परंतु आपल्या लहान भावाचे कौतुक करण्यासाठी जणू आज आपले वाहन गणपतीस दिले असावे.