रांजणगाव खुरी येथे पाण्यात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू..
गुनगुली नदीतील घटना....
बिडकीन प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील रांजणगाव खूरी येथील गुनगुली नदीमध्ये करण गायकवाड सह तीन मुले पोहण्यासाठी गेले होते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे करण अंकुश गायकवाड वय 15 वर्ष या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. नववी वर्गात शिकत असलेला करण गायकवाड व त्याचे तीन मित्र हे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुनगुली नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते पोहोत असताना करण गायकवाड हा खोल पाण्यामध्ये डूबु लागला त्याच्या मित्राने आरडाओरडा केला मात्र करण हा पाण्यामध्ये पूर्ण डुबला होता नागरिकांनी शोधला असता करण मिळून आला नाही घटनेची माहिती बिडकीन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. औरंगाबाद महानगरपालिका अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या साह्याने करण यांचा मृतदेह एक तासानंतर पाण्याबाहेर काढण्यात आला.अग्निशामक दल आर के सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंचार्ज हरिभाऊ घुगे,विनायक लिमकर,व अग्निशामक मयुर कुमावत,सुजित कल्याणकर, इरफान पठाण,किरण पागोरे,वाहन चालक सुभाष दुधे,मनोज राठोड यांच्या वतीने परिश्रम घेण्यात आले .
याप्रकरणी बिडकिन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
रविंद्र गायकवाड, बिडकिन