लांजा: राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांच्या कोट या मूळगावी भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
राणीच्या पराक्रमाला साजेसे, राणीचा वैभवशाली इतिहास नवीन पिढीसमोर आणण्यासाठी कोट गावातील सुपुत्रांनी सपरागिणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टद्वारे कोट गावी राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या उपक्रमात विश्व मराठी परिषदेने सहकार्य करावे अशी मागणी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी अंट बनविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या विश्व मराठी परिषद पुणे मुख्यालयाला लांजा येथील राणी लक्ष्मीबाई स्मारक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. परिषदेने संस्थापक अध्यक्ष
प्रा. क्षीतिज पाटुकले यांच्याशी संस्थात्मक कामांविषयी चर्चा करण्यात आली. सहयोगासंदर्भात परिषदेने सकारात्मक भूमिका स्वीकारली आहे. संस्थाभेट उपक्रमासाठी अध्यक्ष सुभाष लाड, तुकाराम चव्हाण, दीपक नागवेकर, महेंद्र साळवी, विजय हटकर, गणेश चव्हाण, प्रमोद मेस्त्री, प्रकाश हर्वेकर, वैभव चव्हाण, रवी कु आदी मान्यवर उपस्थित होते.