*जालना शहरातील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या मुलांच्या व मुलींच्या वस्तीगृहाची पाहणी राहुल ही खरात यांनी केली*

राहुल खरात वस्तीग्रह निरीक्षण समिती सदस्य जिल्हा जालना

सामाजिक न्याय विभागा अंतर्गत जालना शहरातील आर्थिक दृष्ट्या मागास व मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह तसेच मुलांचे वस्तीग्रह या तिन्ही जालना शहरातील वस्तीगृहाची पाहणी जालना जिल्हा शासकीय वस्तीग्रह निरीक्षण समिती सदस्य राहुल ही खरात यांनी पाहणी केली. यावेळी मुलींच्या वस्तीगृहातील आसन व्यवस्था भोजन व्यवस्था, स्टेशनरी शालेय साहित्य आदींची पाहणी खरात यांनी केली . त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित गृहपाल यांना दिल्या तसेच जात्या ठिकाणी गृहपाल यांनी आपले कर्तव्य नियमित सोयीस्कर बजावावे नसता पुढील कारवाईसाठी पात्र आपणास करण्यात येईल असे देखील खरात यांनी सांगितले. मुलांना व मुलींना कसल्याही प्रकारच्या अडीअडचणी समस्या उद्भव नये यासाठी आपण कटिबद्ध असावे तसेच विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे सकाळी नाष्टा सकाळी जेवण अंडी, बिस्किट, फळ फ्रूट आदीं पुरवठा वेळेवर करावा त्या सोबत शालेय साहित्य, निर्वाह भत्ता आधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या यानंतर खरात यांनी सर्व तिन्ही वस्तीगृहाची पाहणी केल्यानंतर जालना जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमित घावले यांची भेट घेऊन सर्व विषयांची माहिती दिली व विद्यार्थ्यांबाबत होणाऱ्या गौरसोई वेळेतच थांबविण्यात याव्यात. आसे संगीतले.