फुलंब्री शहरात व ग्रामीण भागात सुद्धा गोरी पूजन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे,विविध प्रकारे सजावट केली आहे यामुळे घरात एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे

भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची. गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  

भाद्रपद चतुर्थीला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले की, सर्व जण अगदी आतुरतेने वाट पाहतात ती गौरी आगमनाची. गौरी पूजन हा महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असेही संबोधले जात

 अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.