कर्जाला कंटाळून आत्महत्या करून जीवन यात्रा संपवणाऱ्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथिल पत्रकाराला शासनाच्या वतीने आर्थिक मदत करून . त्याच्यावर असलेले कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे व त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन . खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथील दैनिक भास्कर चे पत्रकार फिरोज खान उर्फ (आलियार ) यांनी कर्जाला कंटाळून काही दिवस अगोदर आत्महत्या करून स्वतःची जीवन यात्रा संपवली आहे .त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात यावी व त्यांच्यावरील असलेले कर्ज तात्काळ माफ करण्यात यावे.शासनाच्या नियमानुसार कर्ज घेत असताना त्याचे पॉलिसी काढल्या जाते त्या पॉलिसीचे कलेम करून त्यातून तात्काळ कर्जमाफी करावी .व आत्महत्याग्रस्त पत्रकार व त्याच्या कुटुंबाला बँकेने त्रास देऊ नये यासाठी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाच्या वतीने खुलताबाद चे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी मोठ्या संख्येने खुलताबाद व औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते .
कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या पत्रकारावरील कर्ज माफी करून आर्थिक मदत दया,महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाची मागणी
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_3b8b813eda4ce4e9742fe7ef01a91826.jpg)