वाघोलीकरांमध्ये महावितरणच्या विरोधात रोष.

सर्वसामान्यांची होते पिळवणूक

वाघोली (ता. हवेली) मध्ये महावितरण विरोधात वाघोलीतील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाघोली महावितरण कार्यालय अंतर्गत वाघोली कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना साधा मीटर घेण्यासाठी देखील अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहे,तर हिच कामे एजंट मार्फत गेल्यानंतर तीन हजार रुपयांपासून तीस हजार रुपये घेऊन तात्काळ मार्गी लावली जात असल्याचा आरोप वाघोलीतील नागरिक करत आहेत. तर अनेक ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे कामे केली जात आहेत,अनेक ठिकाणी सगंनमत करून विनापरवाना खाजगी केबल टाकल्या आहेत,यामध्ये देखील शासनाचा लाखो रुपयांचा महसूल अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने बुडवत आहेत, वाघोली मधील महावितरण कार्यालयात एखादा सर्वसामान्य व्यक्ती गेल्यास त्याला अनेकदा हेलपाटे मारावे लागत आहेत मात्र तेच काम एखाद्या ठेकेदारामार्फत तात्काळ मार्गी लावल्यात तेथील अधिक तत्पर असतात, हेच महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य नागरिकांची या ना त्या मार्गाने अडवणूक करत ठेकेदाराकडे जाण्यास भाग पाडले जात आहे, वाघोली महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांकडून बिल्डरची कामे तात्काळ मार्गी लावली जात आहेत मग सर्वसामान्य ही ग्राहक आहे आणि बिल्डर ही ग्राहक आहे , मात्र यामध्ये देखील बिल्डरची कामे तात्काळ मार्गी व सर्वसामान्यांना हेलपाटे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहे, बिल्डर, ठेकेदार यांच्याकडून होणाऱ्या 'अर्थ' कारणामुळे त्यांची काम लवकर केले जात असून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे.असा आरोप वाघोलीतील नागरिक करत आहेत. वाघोलीतील नागरिकांनी व सोसायटी धारक ग्राहकांनी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी मांडल्या, महावितरणचे अधिकारी सर्वसामान्यांचे फोन देखील उचलत नाही असे देखील काहींनी सांगितले बाबत आमदारांनी तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलवून सर्वांसमोर चांगलेच खडे बोल सुनावले ,तर वरिष्ठांकडे दूरध्वनीवरून तक्रार करत त्यांची चांगलीच खरडपट्टी केली.याअधिकाऱ्यांच्या खरडपट्टीची चांगलीच खमंग चर्चा सध्या वाघोली मध्ये सुरू आहे . या झालेल्या प्रकाराबाबत व नागरिकांच्या तक्रारीबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून विचारणा केली असता त्यांनी फोनवर माहिती देण्यास टाळाटाळ केली,

सर्वसामान्यांचे प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मार्गी लावले नाही तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालावर मोठे जनआंदोलन उभारले जाईल....रामदास दाभाडे मा.जी.प.सदस्य

अनेक वाघोलीकर व ग्राहक मिळून आम्ही यांची तक्रार यांच्या वरिष्ठाकडे करणारा असून त्यांनी जमवलेल्या मिळकती बाबतही लाच लुचपत विभागाकडे लवकरच लेखी तक्रार करणार आहोत. असे एका व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले