सोलापूर- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावाने आई-वडील, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी बालनिधी प्राप्त झालेला आहे. कोविडमुळे जिल्ह्यातील एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना शैक्षणिक खर्चासाठी 10 हजार रूपये देण्यात येणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी केले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क/ साहित्यासाठी 10 हजार रूपये शैक्षणिक खर्चासाठी वितरित करण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे 15 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत.

अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई-वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला (झेरॉक्स प्रत), बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असल्याबाबत बँकेचे पासबुक, बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.