सोलापूर:- आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने यशवंतराव चव्हाण सभागृह सोलापूर येथे बाल मृत्यु कमी करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात अलेली होती , या कार्यशाळेस जिल्हयातील वैद्यकिय अधिक्षक, तालुका वैद्यकिय अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळे मध्ये दिलीप स्वामी यांनी मार्गदर्शन करताना आरोग्य विभागाने ब-याचशा निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे तथापि बालमृत्यु बाबत आरोग्य विभाग व ICDS विभागाने समन्वयाने काम केले तर निश्चितच बालमृत्युच्या कारणाचा शोध घेऊन जिल्हयामध्ये जनतेच्या सहकार्याने उल्लेखनिय काम होऊ शकते. समाजामध्ये आरोग्य विषयक ज्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये प्राधान्याने बालमृत्यु व उपजत मृत्यु हि मोठी समस्या आहे. बालमृत्युची जी कारणे आहेत त्याना अतिशय संवेदनशील पदध्तीनी सर्वांच्या समन्वयाने त्यावर मात करता येईल व बालकांच्या जीविताची हमी देता येईल. असे दिलीप स्वामी यांनी सांगितले. WHO Consultant डॉ.घोडके यांनी लसीकरणाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, साहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा स्तरीय अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.