आ.रमेश बोरनारे हे कारखान्याचे खोटे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करत आहेत संजय निकम यांचा पत्रकार परिषदेत आरोप

प्रतिनिधी शैलेंद्र खैरमोडे/ वैजापूर

वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे जनतेची फसवणूक करून नव्याने सुरू होणाऱ्या खासगी कारखान्याचे तसेच विविध कामांची खोटे श्रेय घेऊन वैजापूर वासीयांची दिशाभूल करत असल्याचा खळबळजनक आरोप संजय निकम यांनी पत्रकार पदिषद घेऊन केला.वैजापूर तालुक्यात महालगाव येथे पंचगंगा उद्योग समूहाच्या श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे ३० तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आहे.या खासगी कारखान्याच्या उद्घाटनाचे श्रेय आमदार रमेश बोरनारे यांनी लाटले असल्याचे आरोप शिवसेनेचे संजय निकम व अविनाश पाटील गलांडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पत्रकार परिषदेत केले,दरम्यान संजय निकम यांनी आमदार रमेश बोरनारे यांचा कारखान्याच्या उभारणीत अथवा मंजुरी मध्ये कवडीचाही वाटा नसल्याचे सांगत बोरनारे हे जनतेला खोट बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.पुढे निकम यांनी २०१४ च्या निवडणूकी मध्ये स्व.आर.एम.वाणी यांच्या पराभूत होण्याचे मुख्य कारण आमदार बोरनारे यांचा फितुरीपणा असल्याची टीका ही त्यांनी केल्या.सध्या सोशल मिडियावर फिरत असलेल्या कारखान्याच्या उद्घाटनाच्या विविध पोस्ट मध्ये‘ वचनपूर्ती,शब्द पाळला असल्याचे संदेश हे बोरनारे यांच्या चमच्यांचे त्यांची नाकामी लपवण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न आहे असा ही आरोप त्यांनी केला.तर कारखान्याचे खरे श्रेय हे मा.आमदार सुभाष झांबड यांना द्यायला हवे असे मत निकम यांनी मांडले.यावेळी आमदार बोरनारे यांच्या वर टीका करत निकम यांनी आमदारांनी विनायक सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही तसेच विनायक साखर कारखाना सुरु करण्यासाठी त्यांनी कुठलेही योग्य पाउल उचलले नाही असे सांगत वैजापूर शहरातील महत्वाची एमआयडीसी,रामकृष्ण सिंचन योजनेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी,माण्याड धरणाची उंची वाढविणे या विविध प्रश्न मार्गी लावायचं सोडून फक्त दुसऱ्यांच्या आयत्या कामाचे श्रेय घेण्यातच व आर्थिक लाभ मिळवण्यात आमदारांनी लक्ष केंद्रित असल्याचे आरोप केले.

बोरनारे यांनी जलसंधारण विभागाकडून मंजूर करून आणलेल्या केटीवेअरच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये गैरव्यवहार केला असून बोरनारेंनी त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाच त्याची कामे देऊन १० ते १५ लाख रुपये खर्च करून २-३ कोटी रुपयांची बिले काढलेली आहे असाही आरोप संजय निकम यांनी केला

 गद्दार आमदार बोरनारे यांचा साखर कारखाना सुरू होण्यात कवडीमात्रही वाटा नाही ते श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे.साधू संतांचा अपमान तालुक्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सरला बेटांचे मठाधिपती रामगिरीजी महाराज व वेरुळचे शांतिगिरी महाराज यांचे नावे खाली छापून आमदारांनी साधुसंताचे अपमान करण्याचे महापाप केले असल्याची टिका अविनाश गलांडे यांनी केली.