सोलापूर :- नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आ. सुभाष देशमुख यांनी दक्षिण तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी तब्बल 50 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे.

 गेल्या आठवड्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात आ. देशमुख यांनी पुरवणी यादीत दक्षिणमधील खराब रस्त्यांबाबत प्रश्नव उपस्थित करत दुरूस्तीसाठी 50 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामध्ये माळकवठे- निंबर्गी रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी, गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ रस्त्यामध्यमध्ये सुधारणा करणे 70 लाख, आहेरवाडी- मद्रे-कुमठे रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी, तेलगांव (मं) कुसुर वडापूर रस्त्यामध्ये सुधारणा करणे 4 कोटी 50 लक्ष, टाकळी-चिंचपूर-बरुर-हत्तरसंग कुडल रस्त्यामध्ये सुधारणा करणे 3 कोटी, होटगी यत्नाळ रस्त्यामध्ये सुधारणा करणे 3 कोटी, वडकबाळ ते वडकबाळ तांडा रस्त्यामध्ये सुधारणा करणे 1 कोटी 20 लाख , होटगी मद्रे रस्त्यामध्ये सुधारण करणे 2 कोटी, माळकवठे औज (मं) रस्त्यामध्ये सुधारणा करणे दीड कोटी, कंदलगाव गुंजेगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे 2 कोटी, मंद्रूप निंबर्गी भंडारकवठे रस्त्यामध्ये मध्ये पुलाच्या मार्गाचे बांधकाम करणे 1 कोटी, येळेगांव गावडेवाडी वांगी मंद्रूप रस्त्यामध्ये सुधारणा करणे 4 कोटी, बोळकवठे नांदणी ते रा.म.मा.क.13 ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे 3 कोटी, माळकवठे औंज (मं) रस्त्यामध्ये भूसंपादन करण 95 लाख, बोराळे अरळी ते प्रजिमा 64 ला जोडणारा रस्त्यामध्ये पुलाच्या पोहोच मार्गासाठी भूसंपादन करणे 61 लाख, रा.म.मा.क्र. 203 ते गुंजेगाव मनगोळी वांगी ते वडकबाळ जवळ रा.म. 13 ला जोडणारा रस्त्यामध्ये सुधारणा करणे 2 कोटी, सादेपूर निंबर्गी कंदलगाव गावडेवाडी मनगोळी रस्त्यामध्ये करणे - 5 कोटी, सोलापूर डोणगाव तेलगाव रस्त्यामध्ये सुधारणा करणे - 7 कोटी, कोंडी हिरज तिऱ्हे रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष, पाथरी तेलगाव रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लक्ष या रस्त्यांचा समावेश आहे.

रखडलेली कामे येत्या काळात मार्गी लावूः आ. देशमुख

भाजपाचे सरकार राज्यात आल्याने सर्व कामांना निधी मिळण्यास गती मिळत आहे. मागच्या सरकारच्या कामात रखडलेली कामे येत्या काळात मार्गी लागतील. दक्षिण तालुक्याचा कायापालट करण्याचा आपला मानस आहे, त्यासाठी आपण कायम प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.