श्रीवर्धन हे निसर्ग सौंदर्याने नटलेले असे कोकणातील पर्यटन दृष्टीने महत्वचे ठिकाण असल्याने या भागातील कोणत्याही प्रदूषणकारी कारखान्याने कोणतीही हानी होईल असे प्रकल्प या भागात येणार नाहीत याची काळजी घेणार आहोत तर ह्या भागातूनच सागरी महामार्ग जाणार असल्याने या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येईल , स्वयं रोजगारामध्ये वादज होईल असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आज बोर्ली पंचतन विभागातील आदगाव, वेळास, वडवली, खुजारे गावातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. 

  रायगडचे खासदार सुनील तटकरे हे आज श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभागामध्ये विविध विकासकामाच्या भूमिपूजन व उदघाटन करण्यासाठी उपस्थित होते यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील आदगाव व कुणबी वाडी आदगाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 2 कोटी रुपयांचा जलजीवन मिशन कार्यक्रमातून मंजूर असलेल्या योजनेचे भुमिपूजन तसेच कोळी समाज पावशे कुटूबीयांच्या साठी 5 लक्ष रुपयाच्या सभागृहाचे उद्घाटन व शंकर मंदिर कामाची पाहणी केली, तसेच वेळास कोंड येथील 10 लक्ष रुपयाच्या हनुमान मंदिर सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन, वडवली येथे 25 लक्ष रुपये निधी मंजूर असलेल्या गावदेवी मंदिर ते खालचा मोहल्ला व शंकर मंदिर रस्त्याचे भूमिपूजन, भरडखोल येथील हेटची आळी येथील 5 लक्ष रुपयाची साकवाचे उद्धाटन तसेच खुजारे येथील जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 8.50 लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे व 25 लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेले अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन तसेच जलजीवन मिशन कार्यक्रमातून सुमारे 1 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रादेशिक क दर्जा पर्यटनतून पाटेकरिण देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी महमद मेमन, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, मंदार तोडणकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सुचिन किर, युवाध्यक्ष सिद्धेश कसबे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष संदेश काते, सुरेश तांबडे, सुजित पाटील, नंदू रघुवीर, आदगाव अध्यक्ष अरविंद कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश मोरे, भंडारी समाज अध्यक्ष विवेकानंद मोरे, चंद्रशेखर मोरे, पोलीस पाटील जुई तोडणकर , माजी सरपंच जागृती तोडणकर, माजी उपसरपंच देवेंद्र मोरे, शशिकांत कोकाटे तसेच वेळास

ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संदिप दिवेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष मंगेश खेडेकर, सचिव प्रकाश दिवेकर

मुंबई मंडळ सचिव संदेश अनंत दिवेकर,बसमाज अध्यक्ष संतोष दिवेकर, महिला अध्यक्ष प्रियंका दिवेकर, तुकाराम वाजे, प्रदिप दिवेकर, दिनेश दिवेकर, प्रदिप दिवेकर, दिपक वाजे, अमित टेमकर, भिकु दिवेकर, रामचंद्र खेडेकर, दिपक दर्गे, खुजारे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष शरद खेडेकर, सरपंच लिलावती पवार, उपसरपंच संतोष घोले, महादेव खेडेकर, दिलीप खेडेकर, आत्माराम काते, पांडुरंग काते, दशरथ घोले, मुंबई मंडळ अध्यक्ष दिनेश दिवेकर, सचिव अजित पवार पदाधिकारी तसेच महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतामध्ये बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, कोकणातील श्रीवर्धन हे नारळ, सुपारी, शेती, बागायती, वन संपदेने नटलेले आहे या भागात कोणत्याही प्रकारे प्रदूषण करणारे कारखाने येऊन देणार नाही, तर शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये असलेले काम कोणीही बदलू शकणार नाही , दिघी पोर्ट येथून रोजगाराची संधी उपलब्ध होईल व पर्यटकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले