यंदाच्या पावसाळयात वरुण राजा जिल्हयावर प्रसन्न झाल्याचे दिसत असतांना जिल्हयातील एकूण 46 मंडळापैकी 33 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील लघु व मध्यम प्रकल्पसुध्दा 100 टक्के भरले आहे. या पावसाळयात 33 मंडळात 62 वेळा अतिवृष्टी झाल्याचे पडलेल्या पावसाच्या नोंदीवरुन दिसून येत आहे. जिल्हयात यावर्षी आजपर्यंत 710 मि.मी. सरासरी पाऊस पडला. मागील वर्षीपेक्षा आज रोजीपर्यंत 5.1 मि.मी. पाऊस जास्त झाला आहे. जिल्हयात यावर्षी सर्वाधिक 787.8 मि.मी. पाऊस मानोरा तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस कारंजा तालुक्यात 536.1 मि.मी. झाला आहे.    जिल्हयातील सहा तालुक्यात 46 मंडळात पर्जन्यमापक यंत्र आहे. या केंद्रात दररोज नियमितपणे पडणाऱ्या पावसाची नोंद घेण्यात येते. वाशिम तालुका- वाशिम, पार्डी टकमोर, अनसिंग, राजगांव, नागठाणा, वारला, केकतऊमरा, कोंडाळा व पार्डी आसरा. रिसोड तालुका- रिसोड, भोर, मोप, वाकद, केनवड, गोवर्धन, रिठद व कवठा. मालेगांव तालुका- मालेगांव, शिरपूर, किन्हीराजा, मुंगळा, मेडशी, करंजी, जऊळका (रेल्वे), चांडस. मंगरुळपीर तालुका- मंगरुळपीर, शेलु बाजार, आसेगांव, पोटी, धानोरा, पार्डी व कवठळ. मानोरा तालुका- मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदूर्जना (अढाव), गिरोली व उमरी आणि कारंजा तालुका- कारंजा, धनज, हिवरा, उंबर्डाबाजार, कामरगांव, खेर्डा, पोहा आणि येवती. आदी 46 मंडळाच्या ठिकाणी ही पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहे.   जिल्हयात या पावसाळयात जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत 33 मंडळात 62 वेळा 65 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस पडल्याचे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. यामध्ये जून महिन्यात रिसोड तालुक्यातील वाकद मंडळात 15 जून रोजी 71 मि.मी., रिठद मंडळात 66 मि.मी., कवठा मंडळात 66 मि.मी. अतिवृष्टी झाली. जून महिन्यात केवळ या तीन मंडळातच अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात वाशिम तालुक्यातील वाशिम मंडळात 14 जुलै रोजी 90.75 मि.मी., पार्डी टकमोर मंडळात 94.50 मि.मी. नागठाणा मंडळात 90.75 मि.मी. कोंडाळा मंडळात 90.75 मि.मी. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळात 1 जुलै रोजी 65 मि.मी., गोवर्धन मंडळात 66.50 मि.मी., रिठद मंडळात 13 जुलै रोजी 73.75 मि.मी., कवठा मंडळात 73.75 मि.मी., रिठद मंडळात 14 जुलै रोजी 70 मि.मी., कवठा मंडळात 70 मि.मी. मालेगांव तालुक्यातील मालेगांव मंडळात 14 जुलै रोजी 65.50 मि.मी., शिरपूर (जैन) मंडळात 13 जुलै रोजी 70.75 मि.मी., 14 जुलै रोजी 65.50 मि.मी., किन्हीराजा मंडळात 14 जुलै रोजी 91.25 मि.मी., मुंगळा मंडळात 74.75 मि.मी., मेडशी मंडळात 74.75 मि.मी., किन्हीराजा मंडळात 13 जुलै रोजी 70.75 मि.मी., 14 जुलै रोजी 65.50 मि.मी., जऊळका मंडळात 14 जुलै रोजी 68 मि.मी., चांडस मंडळात 65.50 मि.मी., मंगरुळपीर तालुक्यातील आसेगांव मंडळात 13 जुलै रोजी 74.50 मि.मी., धानोरा मंडळात 1 जुलै रोजी 68.75 मि.मी. व 14 जुलै रोजी 74.75 मि.मी., मानोरा तालुक्यातील इंझोरी मंडळात 8 जुलै रोजी 65.25 मि.मी., शेंदुर्जना मंडळात 10 जुलै रोजी 71.75 मि.मी., 13 जुलै रोजी 65.75 मि.मी. व 14 जुलै रोजी 66.25 मि.मी. व गिरोली मंडळात 10 जुलै रोजी 96.50 मि.मी. आणि कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार मंडळात 19 जुलै रोजी 77 मि.मी. पाऊस पडल्याने अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली.  ऑगस्ट महिन्यात वाशिम तालुक्यातील वाशिम मंडळात 9 ऑगस्ट रोजी 79.75 मि.मी., पार्डी टकमोर मंडळात 117.75 मि.मी., अनसिंग मंडळात 93.50 मि.मी., राजगांव मंडळात 105 मि.मी., नागठाणा मंडळात 93 मि.मी., वारला मंडळात 78.25 मि.मी., केकतउमरा मंडळात 140.75 मि.मी., कोंढाळा मंडळात 5 ऑगस्ट रोजी 79.3 मि.मी, 9 ऑगस्ट रोजी 99 मि.मी., पार्डी असरा मंडळात 93.50 मि.मी., रिसोड तालुक्यातील मोप मंडळात 8 ऑगस्ट रोजी 66 मि.मी., गोवर्धन मंडळात 5 ऑगस्ट रोजी 84 मि.मी., केनवड मंडळात 9 ऑगस्ट रोजी 68.25 मि.मी., मालेगांव तालुक्यातील मालेगांव मंडळात 5 ऑगस्ट रोजी 100 मि.मी., शिरपूर मंडळात 98.8 मि.मी., 9 ऑगस्ट रोजी शिरपूर मंडळात 98.50 मि.मी., किन्हीराजा मंडळात 72 मि.मी., मेडशी मंडळांत 5 ऑगस्ट रोजी 79.8 मि.मी., करंजी मंडळात 9 ऑगस्ट रोजी 81 मि.मी., जऊळका मंडळात 69.25 मि.मी. आणि चांडस मंडळात 5 ऑगस्ट रोजी 78.5 मि.मी. पाऊस पडला. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगांव मंडळात 9 ऑगस्ट रोजी 74.75 मि.मी., धानोरा मंडळात 5 ऑगस्ट रोजी 74.5 मि.मी., मंगरुळपीर मंडळात 5 ऑगस्ट रोजी 100.5 मि.मी. व 9 ऑगस्ट रोजी 65 मि.मी., शेलु मंडळात 5 ऑगस्ट रोजी 122.5 मि.मी. आणि पार्डी (ताड) मंडळात 5 ऑगस्ट रोजी 78.5 मि.मी., मानोरा तालुक्यातील शेंदुर्जना मंडळात 9 ऑगस्ट रोजी 77.25 मि.मी. आणि गिरोली मंडळात 5 ऑगस्ट रोजी 67.5 मि.मी. कारंजा तालुक्यातील कारंजा मंडळात 9 जुलै रोजी 78.75 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) मंडळात जुलै महिन्यात दोनवेळा आणि ऑगस्ट महिन्यात सुध्दा दोनवेळा असे एकूण चारवेळा येथे आणि मानोरा तालुक्यातील शेंदुर्जना (आढाव) मंडळात जुलै महिन्यात तीनवेळा आणि ऑगस्ट महिन्यात एकवेळा असे एकूण चारवेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं