भारत निवडणूक आयोगाने कालबध्द पध्दतीने मतदारांकडून आधार क्रमांक प्राप्त करुन घेण्यासाठी मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडणी करण्याचा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून निश्चित केला आहे. मतदार यादीतील मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज-6 (ब) तयार करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्हयातील सर्व सहा तालुक्यातील 9 लक्ष 52 हजार 545 मतदारांपैकी 1 सप्टेंबर 2022 पर्यंत 2 लक्ष 24 हजार 436 मतदार ओळखपत्र हे आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण मतदारांपैकी मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी केलेल्या मतदारांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. मानोरा तालुका- एकूण मतदार 1 लक्ष 23 हजार 290 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 43 हजार 339, कारंजा तालुका- एकूण मतदार 1 लक्ष 78 हजार 169 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 52 हजार 560, रिसोड तालुका- एकूण मतदार 1 लक्ष 60 हजार 87 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 45 हजार 995, मुंगरुळपीर तालुका- एकूण मतदार 1 लक्ष 38 हजार 738 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 36 हजार 460, मालेगांव तालुका- एकूण मतदार 1 लक्ष 45 हजार 768 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 19 हजार 421 आणि वाशिम तालुका- एकूण मतदार 2 लक्ष 6 हजार 493 त्यापैकी आधार क्रमांकाशी जोडलेले मतदार 26 हजार 661 इतके आहे. जिल्हयात मानोरा तालुक्यात सर्वाधिक 43 हजार 339 मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी जोडण्यात आले आहे. ही टक्केवारी 35.15 टक्के इतकी आहे. मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज ६-ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्रमांक ६-ब हा भारत निवडणूक आयोगाच्या (eci.gov.in) आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या (https://ceoelection.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रमांक ६-ब हा ERO Net, GARUDA, NVSP, VHA माध्यमांवर देखील उपलब्ध आहे. अर्ज ६-ब छापील प्रती देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांना ऐच्छीक आहे. अर्ज क्रमांक ६-ब बिएलओ यांचे मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येत आहे. मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्रमांक ६- ब मध्ये दर्शविलेल्या ११ पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता येईल. उदा. मनरेगा जॉबकार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीस कार्यालयाकडून निर्गमित केलेले फोटोसहीत पासबुक, आरोग्य विमा स्मार्टकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरबीआयमार्फत वितरीत केलेले स्मार्टकार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे छायाचित्रासह ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र इत्यादी मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छीक आहे. केवळ आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढले जाऊ शकत नाही. जिल्हयातील सर्व मतदार ओळखपत्राचे आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम येत्या 10 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थीतीत पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Loksabha Election Result 2024: कहीं चंद्रबाबू नायडू ना कर दें खेला! मोदी-शाह ने घुमाया टीडीपी चीफ को फोन
नई दिल्ली। लोकसभा चुनाव में 400 पार का नारा दे रही बीजेपी को झटका लगा है। 400 सीटें तो दूर,...
પરશોત્તમ રૂપાલાએ ગુજરાતનાં હજીરા બંદરેથી સાગર પરિક્રમાના ત્રીજા તબક્કાનો શુભારંભ કરાવ્યો
કેન્દ્રીય મત્સ્યપાલન, પશુપાલન અને ડેરી મંત્રી પરશોત્તમ રૂપાલાએ ગુજરાતનાં હજીરા બંદરથી સાગર...
Top Trades For Tomorrow: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश
Top Trades For Tomorrow: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश
Share Market में जानें क्या है Experts के BTST और STBT Ideas | Share Market Tomorrow | CNBC Awaaz
Share Market में जानें क्या है Experts के BTST और STBT Ideas | Share Market Tomorrow | CNBC Awaaz