परभणी/प्रतिनिधी:-गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शांतता समितीच्या बैठकीमध्ये सोमवारी (दि.29) पोलिसांनी हप्ते घेणे बंद केले तर अवैध धंदे आपोआपच बंद होतील असे वक्तव्य केले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी पुरावे द्या, आताच कारवाई करतो असे आ.डॉ.गुट्टे यांना बजावले होते. दरम्यान, या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांवर हफ्तेखोरीचा आरोप केल्यानंतर पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याबद्दल त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
हा प्रकार घडल्यानंतर पोलीस दलामधील अधिकारी, अंमलदार यांच्यामध्ये उद्देशपूर्वक अविश्वासाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच, पोलीस दलातील व्यक्तींना त्रास होईल आणि जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा मालिन झाली आहे. याप्रकणी आ.गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.