कोरोना च्या तीन वर्षांच्या खंडानंतर देशाच्या लाडक्या गणरायचे आगमन यंदा मोठ्या जल्लोषात झाले असून या सार्वजनिक गणेशोत्सवात पैठण तालुक्यात एकूण ३७९ गणेश मंडळाचे गणपती स्थापना करण्यात आली आहे तर या पैकी १० गावात एक गाव एक गणपती बसवण्यात आला असल्याची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी बोलताना दिली.
पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७५ गणपती बसले असल्याचे येथील स पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सांगितले तर बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२० गणेश मंडळ आपल्या गणराया ची स्थापना करण्यात दंग असल्याचे संतोष माने यांनी सांगितले पिंपळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी ७ -३० वाजेपर्यंत ५९ गणपती ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती येथील स पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी दिली.
पैठण शहरात भारतीय स्वातंत्र्य पुर्व काळात बसविण्यात आलेले काही मानाचे गणपती आहेत त्या पैकी आठ मंडळाचे मानाचे गणपती आज दुपारी १२ च्या दरम्यान ते चार च्या दरम्यान शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार भाऊराव थोरात, नगरसेवक रमेश खांडेकर भिकाजी आठवले, राम शेठ आहुजा, अंबादास ढवळे, पाशा धांडे, फाजल टेकडी, हमीद साहेब, मा डि वाय एस पी कांचन कुमार चाटे अरुण भाई पटेल निमेश भाई पटेल दिलीप सनवे पत्रकार, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कापड मंडई गणेश मंडळ, छत्रपती गणेश मंडळ जैनपुरा, उदय भारत गणेश मंडळ लोहार गल्ली, महाराष्ट्र गणेश मंडळ साळिवाडा, योग फ्रेन्ड नुतन सहकारी गणेश मंडळ नेहरू चौक, महाराणा गणेश मंडळ परदेशी पुरा, जय भवानी गणेश मंडळ पिठुंबरा आणि जय बजरंग गणेश मंडळ कहारवाडा पैठण शहर अशी मानाचे गणपती स्थापना करण्यात आली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणा मनोज वैद्य लक्ष्मण पुरी यांनी दिली. पैठण च्या इतिहास प्रथमच रेल्वे पोलीस बंदोबस्त करण्यासाठी पैठण शहरात दाखल झाले असून त्या सोबत हिंगोली चे राज्य राखीव पोलीस बस देखील तैनात करण्यात आले आहे गृह रक्षक दल आणि बिन हत्यारी पोलीस असे मिळून एक शे एक पोलीस बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत गणराया ची स्थापना मिरवणूक खूप जल्लोषात काढण्यात आली लेझीम ढोर ताशे झांज टिपऱ्या च्या गजरात मोठ्या जल्लोषात ही मिरवणूक काढण्यात आली