चौंढाळा येथे एका युवकांची गळफास आत्महत्या..

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील चौंढाळा येथे एका परप्रातीयं चोवीस वर्षीय तरूणांने लिंबाच्या झाडा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी( दि.३१)उघडकीस आलेली असुन आवेश दीनदयाल कसब (वय२४)रा.सबदा ता. पैलानी जि. बांदा (उत्तर प्रदेश)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याविषयी पोलिसांकडुन भेटलेल्या माहिती नुसार,उत्तरप्रदेश मधील सबदा ता.पैलानी जि. बांदा येथील एक चोविस वर्षीय तरूण आपल्या भावासोबत पाचोड येथे मजुरी करण्यासाठी आलेला होता.मागील चार महिन्यापासुन तो तरुण विहामांडवा येथे राहत असून त्यांने चौढाळा शिवार गट नंबर 27 मधील सुनील कांतीलाल सिसोदिया यांच्या बंद जिनींच्या आवारात लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजादार सुधाकर मोहीते हे करीत आहे.