परळी येथील शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुहास विश्वनाथराव शिंदे 

हे नियतवयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले.यानिमित्ताने शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने सेवापूर्ती निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री. सुहास शिंदे यांनी 34वर्षे मुख्याध्यापक पदावरून सेवा केली आहे. आज रोजी ते विद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत..

     या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. प्रतापसिंह शिंदे हे अध्यक्षस्थानी होते तर 

अंबाजोगाई येथील नेताजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण सर,घाटोळे सर, बीड येथील विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक जगताप सर,साखरे सर प्रमुखपाहुणे म्हणून उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक सिद्धेश्वर इंगोले यांनी केले.

याप्रसंगी सुहास शिंदे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाळेतील शिक्षक श्री. भोसले,वाघमारे, खोकले, कर्नर आदींनी सुहास शिंदे सरांबद्दलच्या आठवणींचा उलगडा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्रपरिवार उपस्थित होता.श्री. अशोक फड यांनी सुत्रसंचालन केले आणि श्रीविजय खोकले यांनी उपस्थितांचे आभार मानले