समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत कारवाया सुरु असतात. त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंध घालण्याकरिता जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने दि.३०.०८.२०२२ रोजी अपर पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पो.स्टे.वाशिम शहर हद्दीत ३९,३९५/- रुपयांचा गुटखा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्या पथकाने कामरगाव येथे ६०,९८१/- रुपयांचा गुटखा जप्त केला. पो.स्टे.शिरपूर अंतर्गत चांडस येथे १,२४,८००/- रुपयांचा गुटखा जप्त केला. पो.स्टे.मंगरूळपीर अंतर्गत कोष्टीपुरा येथे ३३,३००/- रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून पो.स्टे.मानोरा अंतर्गत शेंदोना येथे दोन कारवायांमध्ये ४,११२/- रुपयांचा गुटखा जप्त करून अवैध गुटखा विक्री संबंधाने एकूण ०६ ठिकाणी धडक कारवाई करून ०२.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकूण ०६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात, प्रतिबंध व व्यापार वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा २००३ कायद्यान्वये एकूण २५ केसेस करून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सन २०२२ मध्ये संपूर्ण जिल्ह्यात आजपावतो अवैध गुटखा विक्री संबंधाने एकूण ६० आरोपितांवर अवैध गुटखा विक्री संबंधाने गुन्हे नोंदवून त्यांच्याकडून ०२.१९ कोटींचा गुटखा जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री.गोरख भामरे (IPS), पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा वाशिम तसेच सर्व पोलीस स्टेशन यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे. श्री.बच्चन सिंह (IPS) पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
उम्र में कच्ची..क्राइम में पक्की ! नाबालिग लड़की के बारे में कई नए खुलासे, जांच में जुटी Police
उम्र में कच्ची..क्राइम में पक्की !, नाबालिग लड़की के बारे में कई नए खुलासे, जांच में जुटी...
Uniuqe awareness campaign of organ donation
Uniuqe awareness campaign of organ donation
Sarpanch of Moti Pingali village of Kalol registers...
रिश्ता कलंकित: भाई के बच्चे की मां बनी चचेरी बहन, चार साल से कर रहा था दरिंदगी; पड़ोसियों को नहीं लगने दी भनक
भोजपुर जिले में एक बार फिर रिश्ता कलंकित हुआ है। युवक द्वारा अपनी ही चचेरी बहन के साथ चार सालों...
ક્યાં ધરતીપુત્રોને લાખો રૂપિયાનું નુકસાન થયું?
#buletinindia #gujarat
2024 KTM 1390 Super Duke R से उठा पर्दा, शार्प स्टाइलिंग के साथ मिलेगा अधिक शक्तिशाली इंजन; जानें डिटेल्स
KTM AG ने वैश्विक बाजारों के लिए न्यू जेन 1390 Super Duke R और 1390 सुपर ड्यूक आर का खुलासा किया...