परभणी/प्रतिनिधी:- जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने पिके सुकू लागली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून 1800 क्युसेस वेगाने डाव्या कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जलसंपदा मंत्री, आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 मागील महिनाभरापासून परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम हाताशी आलेला असताना शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. कोरड्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन, कापूस ही पिके वाळून जात आहेत. खरीप हंगाम हातातून गेला तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, त्यात आता कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे, त्यामुळे जायकवाडी धधरणातून 1800 क्युसेस वेगाने डाव्या कालव्यात पाणी सोडावे. सध्या जायकवाडीच्या कालव्यात कालव्यांची दुरुस्ती झालेली नसल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाणी वेगाने सोडावे अशी मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्र्यांशी संपर्क साधून पाणी तात्काळ सोडण्याची मागणी केली. त्यावर जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले आहे. तसेच औरंगाबाद विभागाचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सबीनवार यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली असून दोघांनी ही पाणी सोडण्यासाठी सकारात्मक भमिका घेवू असे सांगितले.