पाथरी:- तालुक्यातील पेठ बाभळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते व हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

    ज्यामध्ये १ कोटी रुपयांचे पांदण रस्ते, १ कोटी १० लक्ष रुपयांचा कोल्हापुरी बंधारा, ५५ लक्ष रुपयांचा शादीखाना, ४५ लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक व सीसी रोड तसेच दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक व सीसी रोड २६ लक्ष रुपये, १२ लक्ष रुपयांचा पुल व ४० लक्ष रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना यासाठी मी मंजुरी मिळवली होती. 

 पाथरी तालुक्यात प्रामुख्याने आपल्याला रेणुका कारखान्याचे एक्सपान्शन करणे, गावोगाव पांदण रस्ते करणे, राज्य व नॅशनल महामार्गाला जोडणारे जोड रस्ते निर्माण करणे आणि उच्च दाबाची आणि २४ तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणे हे काम पूर्णत्वास न्यायचं आहे. त्यासाठी बाबाजानी दुर्राणी कायम प्रयत्नशील राहील असे आश्वासन दीले. मागच्या काळात आपण १६ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर करून आणले त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. यानंतर अजून १९ कोटी रुपयांचे बंधारे प्रस्तवित आहेत.

आतापर्यंत अनेक ठिकाणी पांदण रस्ते आपण पूर्ण केले, यानंतर १६ गावात एकूण ६९ किलोमीटरचे प्रस्तावित रस्ते आहेत. यासाठी बाबाजानी दुर्राणी शासन दरबारी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच त्याची मंजुरी आपल्याला मिळेल. तालुक्याला पाणी मुबलक असून त्यासाठी शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यासाठी बाबाजानी दुर्राणी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.

ज्याप्रमाणे बाभळगाव येथे चार ते पाच कोटी रुपयांचे कामे पूर्ण केले. विकासाचा हा पॅटर्न संपूर्ण पाथरी तालुक्यात राबवायचा आहे. तालुक्याने कायम बाबाजानी दुर्राणी यांच्यावर  विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षाला ताकद दिली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवून पवार साहेबांच्या विचाराला बळकटी देण्याचे काम आपण सर्व करु अशी अपेक्षा दुर्राणी यांनी व्यक्त केली.निश्चितच तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.श्री. अण्णासाहेब रणेर, श्री. संजूकाका रणेर व सर्कलमधील सर्व गावकरी आणि पदाधिकारी यांचे आभार, अतिशय सुंदर व भव्य कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले.