आठ दिवसात पाट दुरुस्ती करून शेतकऱ्यांसाठी धान रोवणी करिता दिना पाटबंधारे विभागाचे पाणी सोडा आमदार डॉ देवराव होळी

चामोर्शी येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागाचे कालवे सल्लागार समितीचे महत्वाचे बैठक संपन्न झाले या बैठकीत पाटबंधारे विभागाचे पुढील कामकाजाचे महत्वाचे नियोजन करण्यात आले यामधे पुढील आठ दिवसात प्रमुख पाटचारी क्यानल दुरुस्ती करून तत्काळ पाटबंधारे विभागाने पाणी सोडावे हे निर्णय घेण्यात आले यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गायकवाड , डेप्ति मेश्राम अभियंता दुधबावरे , भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी दिलीप चलाख , साईनाथ बुरांडे ,प्रतीक राठी ,व तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते