परळी वैजनाथ (आप्पासाहेब गोरे)
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
'आजचा विद्यार्थी हा देशाचा उद्याचा नागरिक आहे. विद्यार्थी जितका ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी, जिद्दी, आत्मविश्वासू असेल त्यावर राष्ट्राच्या भविष्याची उज्वल भिस्त असेल. या अनुशंगाने आज या स्थितीतही अनेक शिक्षकजन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयप्रेम, समाज प्रेम निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत.
याचा प्रत्यय आज येथे आला. औरंगाबाद विभागाचे माननीय पोलीस महानिरीक्षक ( आय.जी.)यांचा सोमवारी परळी वैजनाथ दौरा होता. दरम्यान, त्यांचा ताफा देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाला. यावेळी दर्शन घेताना वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. आय.जी. यांच्याकडे चिमुकला विद्यार्थी अत्यंत कुतूहलाने पाहत असल्याचे पाहून उपस्थित डी वाय एस पी सुनील जायभाये यांनी 'तुला काय व्हायचय?' असे विचारले. तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता 'मला एस.पी. व्हायचय..!' असे बाणेदारपणे उत्तर दिले.याला जोडुनच एस.पी. कशासाठी व्हायचे? असे विचारला असता तो म्हणाला, समाजातील गुंडगिरी संपवून चांगल्या माणसांना न्याय देण्यासाठी...!!'
तेव्हा मात्र डीवायएसपी सुनील जायभाये यांनी त्याचा आत्मविश्वास, जिद्द आणि त्याची समाज, राष्ट्र प्रेमाविषयी असलेली भावना,व या वयातील विचारसरणी पाहून त्याच्यासोबत फोटो काढायला क्षणाचाही विलंब केला नाही. सार्थक हा ज्येष्ठ लेखक,निवेदक प्रा.बिभिषण चाटे यांचा मुलगा आहे. सार्थक ला भविष्यातील यशासाठी माननीय महोदयांनी प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने शुभेच्छा दिल्या.
---------------
*राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार यांचा विद्यार्थी*
सार्थक हा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार यांचा विद्यार्थी असून जरेवाडी (ता.पाटोदा) या मॉडेल स्कूलचा आहे. मंथन सह अनेक परीक्षेतील तो गुणवंत आहे. तेथील शिक्षण अत्यंत कडक शिस्तीचे असल्याचे सर्वश्रुत आहे. प्रचंड अभ्यास घेण्या समवेत राष्ट्र प्रेमाचे धडे या शाळेत दिले जातात. याचाच हा सकारात्मक भाग असल्याचे यातुन स्पष्ट झाले.
----------------------------------------