वैराग :- दहिटणे मुंगशी रोडवर वस्तीवर शेळीपालन कंपाउंडचा कडीकोयंडा तोडून चोरी करत असल्याचा संशय आल्याने फिर्यादी नागनाथ दामू साठे यानी पाठलाग केला . सदर चोर दुचाकीवर दहिटणे गावाकडे दुचाकीवर पलायन करीत असल्याचे दिसले . ग्रामस्थांनी विजय विनोद शिंदे ( रा सौंदणे ता . मोहोळ ) व भुजंग रघू पवार ( रा . गावसूद जि . उस्मानाबाद ) या चोरांचा पाठलाग करून वैराग पोलिसांच्या स्वाधीन केले . ही घटना २ ९ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली .