परळी प्रतिनिधी: अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने परळीत बिंगो जुगार खेळणाऱ्या व खेळणाऱ्या वर धडक कारवाई केली आहे . या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे .
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार , परळी शहरातील मलिकपुरा भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाईन बिंगो नावाच्या जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले म्हणून अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने धडक कारवाई केली .
यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याचप्रमाणे आरोपींकडून सुमारे 42070 रु . ऐवज जप्त करण्यात आला आहे . याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो.ना. तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. गुट्टे हे करीत आहेत