केंद्र शासनाच्या केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत तालुक्यातील बचत गटातील महिलांना, शेतकरयांना,युवकांना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन तालुका कृषी अधिकारी मालेगांव यांच्या माध्यमातून करण्यात आले. या वेळेस महिलांनी,युवकांनी शेतकरी वर्गाने सदर योजनेत सहभागी होऊन कसे उद्योग व्यवसायाकडे वळावे ह्या विषयी माहिती दिली. आपल्या शेतात पिकणारा शेती माल जश्यास तसा व्यापाऱ्याला विकला तर त्यातुन नफा कमी मिळतो.म्हणून त्या शेती मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करून त्यापासून सूक्ष्म अन्न प्रक्रिया करून ते विकल्यास नफा पण भरघोस होतो आणि हाताला काम लागते व स्वतःचा व्यवसाय उभा राहतो म्हणून शेतकर्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून सक्षम व्हा उद्योजक व्हा अशी माहिती देत भविष्यात कोणता लघु उद्योग सुरू करून त्यांना शासनाकडून किती अनुदान व बँकेकडून कर्ज कसे मिळू शकते ह्या वर सुद्धा इतेभुत माहिती दिली. ह्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालेगांव तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ प्रिया ताई पाठक ह्या होत्या.तर सदन व्यक्ती वाढवे मॅडम आणि मंडळ कृषि अधिकारी मापारी साहेब ह्यांच्यासह कृषि विभागातील सर्व कर्मचारी,शेतकरी, बचत गटाच्या महिला, उमेद व माहीमच्या सर्व महिला,तालुक्यातील प्रगतशील शेतकरी बंडू आडे,अमोल नवघरे, विनोद भोयर,अजिंक्य मेडशिकर ह्यांचासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रंचालन धनजय शितोळे ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन इंगोले ह्यांनी केले.