सोलापूर : - संत आसाराम बापू हे तुरुंगात जाऊन नव वर्ष झाले आहेत अद्यापही त्यांची सुटका होत नाही असा प्रश्न उपस्थित करत 30 ऑगस्ट या अन्याय दिवसाच्या विरोधात सोलापुरात श्री योग वेदांत सेवा समिती, युवा सेवा संघ, महिला उत्थान मंडळ, संस्कृती रक्षक संघ तसेच भारत जागृती मोर्चा या संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

संत आसाराम बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्काचे हनन होत आहे तरी देखील याची दखल घ्यावी तसेच त्यांचे वय, तब्येत व सामाजिक कार्याच्या आधारेता, तात्परता जाणून त्यांना जामीन किंवा पेरोल व आवश्यक स्वास्थ उपचार उपलब्ध करून दिला जावा, जोधपुर उच्च न्यायालयात त्यांच्या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.