कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता.शिरूर येथील भीमा नदीवरील पुलाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. या कचऱ्याने पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, महिला व नागरिकांसह प्रवाशांना त्रास ही नये तसेच नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा सफाई करण्यात आली.
कोरेगाव भीमा येथील भीमा नदीवरील पुलाजवळ दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात कचरा पडत असतो यासाठी प्रामुख्याने शहरातून व इतर गावातून येणारे कामगार व प्रवासी कचरा टाकत असतात. यामुळे पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा साठतो पेरणे, ता.हवेली व कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीला वारंवार काळजी घेत कचरा साफसफाई करावी लागते.
कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या वतीने कचरा सफाई करण्याबरोबरच याठिकाणी सूचना फलक व सी सी कॅमेरा बसवण्यात येणार आहे व कचरा टाकनाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असून यासाठी आम्ही काम करत आहोत. ग्रामस्थांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी ग्राम पंचायत प्रयत्न करत आहे असल्याचे यावेळी ग्रामविकास अधिकारी रामराव दवणे यांनी सांगितले.
तर कोरेगाव भीमा हे ऐतीहासिक वारसा असलेले गाव आहे येथील नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने आम्ही काळजी घेत असतो. कामगार व प्रवासी यांनी येथे कचरा टाकू नये अन्यथा या लोकांवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी संबधित ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल शहाजी गव्हाणे यांनी स्पष्ट केले.