बीड (प्रतिनिधी) नगर बीड रोडवरील जळगाव येथे घडली घटना आष्टी तालुक्यातील जळगाव येथे लातूर वरून भिवंडी कडे लाकड घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 43 BG 11 26 या क्रमांकाचा ट्रक झाला पलटी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
मिळालेली माहिती अशी की अरविंद कांबळे वय वर्षे ३० राहणार लातूर असे ट्रक चालकाचे नाव आहे.लातूर येथून लाकड घेऊन भिवंडीला जाणारा ट्रक जळगाव येथे खड्डे चुकवत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला.साबलखेड ते आष्टी या एकूण २० किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत रोज कुठे ना कुठे अपघात घडत आहे.
विविध सामाजिक संघटनेने निवेदन दिले आहे रस्ता रोको केला आहे परंतु या संबंधित अधिकाऱ्याला कसलीही जाग येत नाही गेंड्याचे कातडे पांघरून बसलेले अधिकारी यांना जाग कधी येईल अशी तीव्र प्रतिक्रिया जनतेच्या मनात निर्माण होत आहे.